
काळोखाच्या सावल्या
मावळतीच्या सुर्या सोबत
मनातला अंधार दाटत जातो,
मग सभोवताली उंच उंच
सावल्यांचा विळखा पडतो ।
जन्मल्या पासून सोबत करणारी
'मी' पणाची सावली ,
मृत्य पर्यंत साथ देते ।
'व्देष' म्हणजे वया सोबत
वाढत जाणारी सावली,
धर्मं, जात -पातिची संगत
तेला फार भावली.
सुखी संसार उध्वस्त करणारी
'संशयाची' टिचभर सावली,
स्वत: भोवती पाश गुंडाळणारी
'मोह मायेची' सावली.
प्रकाशातील सावल्यांचे एक बरे असते,
काळोखा पडल्यावर सोडून जातात,
काळोखाच्या सावल्या....
संजय पाटील
मावळतीच्या सुर्या सोबत
मनातला अंधार दाटत जातो,
मग सभोवताली उंच उंच
सावल्यांचा विळखा पडतो ।
जन्मल्या पासून सोबत करणारी
'मी' पणाची सावली ,
मृत्य पर्यंत साथ देते ।
'व्देष' म्हणजे वया सोबत
वाढत जाणारी सावली,
धर्मं, जात -पातिची संगत
तेला फार भावली.
सुखी संसार उध्वस्त करणारी
'संशयाची' टिचभर सावली,
स्वत: भोवती पाश गुंडाळणारी
'मोह मायेची' सावली.
प्रकाशातील सावल्यांचे एक बरे असते,
काळोखा पडल्यावर सोडून जातात,
काळोखाच्या सावल्या....
संजय पाटील

तुमच्या 'पाऊलखुणा', 'माझा गाव' आणि 'मोल' ह्या कविता खरंच छान आहेत.
उत्तर द्याहटवातसंच 'मीपण', 'व्देष' व 'संशय' ह्या नकारात्मक भावना वर्णणारी
'काळोखाच्या सावल्या' हि कविता तर अप्रतिमच आहे!