
पाऊलखुणा
मी समुद्राच्या किनारयावर उभा
सुर्य अस्ताला जाण्याच्या वाटेवर
शांत समुद्रात दूर वरुन लाट येतेय
मी चार पावले मागे सरलो
ओल्या वाळूवर उमटल्या पाउलखुणा
एक लाट येउन आदळली किनारयावर
पुसून नेल्यात पाउलखुणांचे अस्तित्व
आता पर्यन्त सुर्य पण अस्ताला गेला
आपल्या अस्तित्वाची
एक ही खूणगाठ मागे सोडली नाही.
sanjay patil

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा