
माझा गांव
मावळतीला जाणारा सूर्य
थांबला दबकत एक क्षण,
गाई गुरे गोठयांकडे परतले
उडवत धुळीचे सोनेरी कण,
आकाशातला दिवा विझला ,
गांव माझा काळोखाच्या कुशीत निजला.
मंदावले दिवसभर
चमकणारे नदीचे पाणी ,
विसावले झाडावरील
पक्षांची गाणी,
मैफीलीत सुरावल्या गझला ,
गांव माझा काळोखाच्या कुशीत निजला.
घरट्या कड़े परतले पक्ष्यांचे थवे ,
उंबरठयात पेटले
मिणमिणते दिवे,
चांदण्यांनी आसमंत सजला ,
गांव माझा काळोखाच्या कुशीत निजला.
संजय पाटील
मावळतीला जाणारा सूर्य
थांबला दबकत एक क्षण,
गाई गुरे गोठयांकडे परतले
उडवत धुळीचे सोनेरी कण,
आकाशातला दिवा विझला ,
गांव माझा काळोखाच्या कुशीत निजला.
मंदावले दिवसभर
चमकणारे नदीचे पाणी ,
विसावले झाडावरील
पक्षांची गाणी,
मैफीलीत सुरावल्या गझला ,
गांव माझा काळोखाच्या कुशीत निजला.
घरट्या कड़े परतले पक्ष्यांचे थवे ,
उंबरठयात पेटले
मिणमिणते दिवे,
चांदण्यांनी आसमंत सजला ,
गांव माझा काळोखाच्या कुशीत निजला.
संजय पाटील

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा